Thursday, December 2, 2010

पोलिसातला माणूस मला पहिल्यांदा दिसतो….

ऑन ड्युटी २४ तास चं शूटिंग  पूर्ण  होतंय…या संपूर्ण  प्रवासात  एक  वेगळीच  नशा होती. या पूर्वी हे  खाकीवाले पाहिल्यावर  माझ्याही  डोक्यात नको नको  ते विचार  यायचे , आज हा  सिनेमा  दिग्दर्शित  केल्यावर  मात्र प्रत्येक   पोलिसातला माणूस मला पहिल्यांदा  दिसतो. मला  सांगा, कोणत्या क्षेत्रात १००%  प्रामाणिकता आणि पारदर्शकता आहे?  पोलीस दलातही चांगल्या, वाईट  दोन्ही  प्रकारची माणसं आहेत.  पण काही वाईट लोकांमुळे  संपूर्ण  पोलीस दलाला वाईट म्हणणे  मूर्खपणाचेच आहे!!! आज  या पोलिसांमुळे आपण आपल्या घरात सुरक्षित झोपू  शकतो , नाहीतर काय झालं असतं, याची कल्पना न केलेलीच बरी …
              या पोलीस  खात्यावर, सरकारवर, सर्वसामान्य  जनतेवर, राजकारणावर अगदी सहज  “कमेन्ट्स” केल्या आहेत . कोणा एकाची बाजू  घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. मात्र हा सिनेमा पाहिल्यावर पोलिसांना जाता – येता आपल्याला नक्कीच सलाम करावासा वाटॆल . चित्रपट पूर्ण होताना आमच्या लक्षात आलं, की पोलीस हा खरंतरं आपला मित्र आहे. याचीच जाणीव करून  देण्यासाठी  मी आणि माझी टीम ऑन ड्युटी २४ तास काम करत आहोत.