Wednesday, November 24, 2010

काय आहे ऑन ड्युटी २४ तास”?

आजपर्यंत मी अगं बाई अरेच्चा, जत्रा  यांसारखे  अनेक विनोदी चित्रपट केले आणि आता”ऑन  ड्युटी २४ तास”च्या माध्यमातून  लवकरच  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचं  नाव आणि विषय अगदीच वेगळं  आहे . मग  नक्की  आहे  काय  हा  ”ऑन ड्युटी २४ तास”?
                         व्यावसायिक  सिनेमांमध्ये   गणला जाणारा  गल्लाभरू सिनेमा नक्कीच  आहे ! ठेका  धरायला  लावणा-या  गाण्यांचा  सिनेमाही  नक्कीच  आहे ! माझा  आणि संतोष पवारचा एक  खास  प्रेक्षकवर्ग  आहे,  त्यांच्यासाठीही  हा  सिनेमा  आहे  पण त्याहीपलीकडे हसता हसता अंतर्मुख  करणारा  हा  सिनेमा असेल.  आत्तापर्यंतच्या  विनोदी सिनेमांच्या रांगेत ”ऑन ड्युटी २४ तास”  आपलं  एक वेगळं स्थान  निर्माण करेल, असा विश्वास वाटतो. मी हे एवढं छातीठोकपणे  सांगू  शकतोय,  कारण  पहिल्यांदाच  मराठी  सिनेमाच्या  इतिहासात “महाराष्ट्र पोलीस”  खात्यावर  मी  सिनेमा   करतोय.  आजपर्यंत  मराठी  किंवा  हिंदी  सिनेमांमधून  दिसून येणारे  पोलीस  हे  लाचखाऊ,  क्लायमँक्स ला  सर्व  काही  घडून  गेल्यावर  य़ेणारे   नाहीतर  एवढे प्रामाणिक  की  आपल्याला  प्रश्न  पडावा , एवढे प्रामाणिक पोलिस कधी असतात काय?
                                      माझ्या   सिनेमात  पोलिसांकडे  एक  तुमच्या –आमच्यासारखा “माणूस” ह्या  नजरेतून  पाहिलं  आहे. त्यांनाही  आपल्यासारख्याच  समस्या  असतात,  त्यांनाही त्यांच्या  कुटूंबासोबत  चार  आनंदाचे  क्षण  घालवावेसे  वाटतात.  त्यांच्यातल्या “ माणसा”चं दर्शन  ह्या  सिनेमात  नक्की  बघायला  मिळेल.

Tuesday, November 16, 2010

निंदा कोणी, कोणी वंदा..येई धावून वेळेला रे खाकीवाला बंदा….

मुंबईवरील  २६/११ अतिरेकी  हल्ल्याच्या वेळी  महाराष्ट्र  पोलिसांनी ज्या धैर्याने  दहशतवादाचा सामना केला,  तो त्यांच्या कर्तव्याचा भाग  नक्कीच होता. पण त्यांनी दाखवलेलं साहस  म्हणजे,  आपल्या  सर्वांवर  केलेले  उपकार  होते,  हे   कायम लक्षात ठेवलं पाहिजे.  कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणा-या पोलिसांनी   अतिरेक्यांना कसं  सामोरं जावं, याचं  रीतसर ट्रेनिंग दिलं  जात  नाही.    घरचं  बजेट  सांभाळणा-या   माणसांना  अचानक   भारताचा  वित्त  मंत्री  केलं , तर  काय  डोंबल  समजणार???
                              नेमकं हेच २६/११ च्या वेळी घडलं होतं.  देशाच्या विरोधात  पुकारलेलं   ते  अघोषित युद्धच   होतं ना !  अतिरेक्यांच्या   हातातल्या एके ५६ , एके ४७ या हत्यारांना   पोलीस ३.३ रायफलने  प्रत्त्युत्तर   देत  होते.  त्याने  काय साध्य होणार?  तरीही त्यांनी  प्रयत्न  सोडले नाहीत. खरंच  हे  पोलिसांचे उपकार  म्हणायला  हवेत.  जगभरात  एक  अद्वितीय  घटना घडली, जीवंत  अतिरेक्याला  पकडलं  गेलं.
जगाच्या  पाठीवर असा  तुकाराम  कुठेही   पाहायला  मिळाला  नाही. तो   तुकाराम या  महाराष्ट्राच्या  मातीतलाच.. महाराष्ट्र  पोलिस दलाचा जवान होता.
                                       “ घरा-दारा  सोडूनिया तुझ्या-माझ्या साठी
                                        निघाला पोलीसमामा उपाशीपोटी
                                       लढाया बंदुकीशी घेवूनि हाती काठी
                                         उन्हातान्हामधी, बाबा खाकीवाला उभा देवाच्या रूपामधी
                                         निंदा कोणी, कोणी वंदा..येई धावून  वेळेला रे खाकीवाला बंदा….”

Saturday, November 13, 2010

create quality cinema

Odyssey Corporation Limited is one of most emerging film production & distribution house based in Mumbai. Its sole aim to create quality cinema in the coming future & penetrate the market with several diverse film projects while creating niche within without compromising on the entertainment factor.
The company has a vision to bring original talents into the Indian Film Fraternity & get the best out of them. Odyssey Corporation Limited is a public listed company at Bombay Stock Exchange. We are engaged in Construction business & Financial Services.
After the success of Khatta Meetha’s Worldwide release, Odyssey Corporation Limited is now producing a Marathi Film ‘ON DUTY 24 TAAS’. The film has been directed by renowned filmmaker Kedar Shinde & will be releasing soon all over Maharashtra.

Exclusive photos of making of "On Duty 24 Taas"










“ ऑन ड्युटी २४ तास”.

२६/११ च्या हल्ल्यानंतर चौकशा – राजीनामे- शोकसभा खूप काही झालं! यात वाद-संवाद ,आरोप-प्रत्यारोप खूप काही घडलं! पण आपण आपल्या शहीद वीरांना गमावल्याची सल तशीच राहिली. मीही माझ्या कामात गुंतलो.  २६/११ तारीख आल्यावर ती घटना त्या दिवसापुरती चर्चेत राहिली.
                                  वर्षागणिक एक मराठी सिनेमा निर्माण करायचा, असा काही दिवसांपूर्वी मी संकल्प केला होता. २००९ साली “इरादा पक्का” नावाचा सिनेमा दिग्दर्शित केला होता. २०१० साली काय करायचं, असा विचार डोक्यात येत असताना “ओडिसी कार्पोरेशन लिमिटेड” कंपनीचे प्रमुख मला भेटले. त्यांनी माझ्यासोबत सिनेमा करण्याची इच्छा व्यक्त केली, पण संहितेचं काय? सिनेमा करायचा, तर तो टिपिकल विनोदी.  काहीतरी आगळं-वेगळं करायला हवं,हे डोक्यात पक्कं होतं. अचानक संतोष पवार आठवला. खूप वर्षांपूर्वी आम्ही एकत्र स्पर्धा करत असताना, त्याची “अटेन्शन” नावाची एकांकिका गाजली असल्याचं  स्मरण झालं. ताबडतोब फ़ोनाफ़ोनी करून भेट झाली. त्याच्या कथेवर सिनेमा करायचा विचार डोक्यात रेंगाळू लागला. त्यालाही कल्पना आवडली आणि त्या कथेवर पटकथेचे संस्कार सुरू झाले.
आता लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार केदार शिंदेचा नवा सिनेमा असेल, “ ऑन ड्युटी २४ तास”.
                                                       
                                                                               केदार शिंदे

Monday, November 8, 2010

अस्सल "केदार शिंदे टच".....

दिवाळी आली आली म्हणताना दिवाळी संपलीसुद्धा! सगळ्यांनी दिवाळीची सुट्टी मजेत घालवली असेलच. काही जण मात्र "इतरांची" दिवाळी मजेत आणि सुरक्षित जावी, म्हणून ड्युटीवर हजर होते. गणपती असो वा दिवाळी, त्यांना आपल्या कर्तव्याचा कधी विसर पडला नाही, त्यांची ड्युटीही ९ ते ५ च्या चाकोरीत बांधलेली नव्हती. ते वचनबद्ध होऊन तुमच्या-आमच्यासाठी २४ तास काम करत आहेत आणि ते म्हणजे"पोलीस"समाजाच्या सुरक्षेसाठी "ऑन ड्युटी २४ तास"वचनबद्ध असलेल्या पोलिसांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. पण आपल्यासारखी तीही माणसंच आहेत ना! त्यांचेही आपल्याप्रमाणेच काही प्रश्न आहेत. आजपर्यंत यावर अनेकदा चर्चा झाल्या आहेत. पण का कोणास ठाऊक, त्यातली तीव्रता समाजातल्या इतर वर्गाना जाणवली नाही. म्हणूनच केदार शिंदे या संवेदनशील दिग्दर्शकाने एका वेगळ्या शैलीत त्यांच्या समस्या प्रकाशझोतात आणण्याचं आव्हान स्वीकारलं आहे. अस्सल "केदार शिंदे टच" असणारा हा नवा सिनेमा "ऑन ड्युटी २४ तास". एक प्रामाणिक प्रयत्न.. केदार शिंदे टच म्हटल्यावर तुम्ही नक्कीच कल्पना करू शकता, ती निखळ आनंद देणा-या, खळखळून हसवणा-या आणि तरीही अंतर्मुख करणा-या सिनेमाची.... टीम "ऑन ड्युटी २४ तास"
------

Friday, November 5, 2010

Short Film Competition


Hello, Kedar Shinde is coming back with a bang with his upcoming movie,"On Duty 24 taas". He is organsing a competition with intention to provide a good platform to your art of film making. We are providing you an audio clip of 2 min and you have to make a video on real police.
Best 10 videos will showcase in front of experts in cinema and they will announce the winner among the videos. The winner will get an opportunity to run his/her video in credit list of Kedar Shinde's upcoming movie "On Duty 24 taas" and also the name of the winner will be added in the credit list of the cinema.
Last date for video submission is 30th November, 2010. After that no video will be accepted.
Those who want to participate in this contest please contact on email id. kedar.onduty24@gmail.com. We will send you the non-edited version
.



Rules and regulation of competition are as follows:-
1. Participants can fill only one form, only one entry will be accepted.
 2. Video should be in DV or HDV format
3. No library shots and downloaded shots are acceptable. . Only real shots will be accepted
4. Do not download your video on any social networking site before result of competition for privacy purpose
5. Please attach your registration form and your identity proof (photocopy of Passport/ photocopy of electricity bill) along with your video while submission
6. Expenses will  not be provided
7. Judge’s decision will be the final decision