Thursday, December 2, 2010

पोलिसातला माणूस मला पहिल्यांदा दिसतो….

ऑन ड्युटी २४ तास चं शूटिंग  पूर्ण  होतंय…या संपूर्ण  प्रवासात  एक  वेगळीच  नशा होती. या पूर्वी हे  खाकीवाले पाहिल्यावर  माझ्याही  डोक्यात नको नको  ते विचार  यायचे , आज हा  सिनेमा  दिग्दर्शित  केल्यावर  मात्र प्रत्येक   पोलिसातला माणूस मला पहिल्यांदा  दिसतो. मला  सांगा, कोणत्या क्षेत्रात १००%  प्रामाणिकता आणि पारदर्शकता आहे?  पोलीस दलातही चांगल्या, वाईट  दोन्ही  प्रकारची माणसं आहेत.  पण काही वाईट लोकांमुळे  संपूर्ण  पोलीस दलाला वाईट म्हणणे  मूर्खपणाचेच आहे!!! आज  या पोलिसांमुळे आपण आपल्या घरात सुरक्षित झोपू  शकतो , नाहीतर काय झालं असतं, याची कल्पना न केलेलीच बरी …
              या पोलीस  खात्यावर, सरकारवर, सर्वसामान्य  जनतेवर, राजकारणावर अगदी सहज  “कमेन्ट्स” केल्या आहेत . कोणा एकाची बाजू  घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. मात्र हा सिनेमा पाहिल्यावर पोलिसांना जाता – येता आपल्याला नक्कीच सलाम करावासा वाटॆल . चित्रपट पूर्ण होताना आमच्या लक्षात आलं, की पोलीस हा खरंतरं आपला मित्र आहे. याचीच जाणीव करून  देण्यासाठी  मी आणि माझी टीम ऑन ड्युटी २४ तास काम करत आहोत.
                    

Wednesday, November 24, 2010

काय आहे ऑन ड्युटी २४ तास”?

आजपर्यंत मी अगं बाई अरेच्चा, जत्रा  यांसारखे  अनेक विनोदी चित्रपट केले आणि आता”ऑन  ड्युटी २४ तास”च्या माध्यमातून  लवकरच  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचं  नाव आणि विषय अगदीच वेगळं  आहे . मग  नक्की  आहे  काय  हा  ”ऑन ड्युटी २४ तास”?
                         व्यावसायिक  सिनेमांमध्ये   गणला जाणारा  गल्लाभरू सिनेमा नक्कीच  आहे ! ठेका  धरायला  लावणा-या  गाण्यांचा  सिनेमाही  नक्कीच  आहे ! माझा  आणि संतोष पवारचा एक  खास  प्रेक्षकवर्ग  आहे,  त्यांच्यासाठीही  हा  सिनेमा  आहे  पण त्याहीपलीकडे हसता हसता अंतर्मुख  करणारा  हा  सिनेमा असेल.  आत्तापर्यंतच्या  विनोदी सिनेमांच्या रांगेत ”ऑन ड्युटी २४ तास”  आपलं  एक वेगळं स्थान  निर्माण करेल, असा विश्वास वाटतो. मी हे एवढं छातीठोकपणे  सांगू  शकतोय,  कारण  पहिल्यांदाच  मराठी  सिनेमाच्या  इतिहासात “महाराष्ट्र पोलीस”  खात्यावर  मी  सिनेमा   करतोय.  आजपर्यंत  मराठी  किंवा  हिंदी  सिनेमांमधून  दिसून येणारे  पोलीस  हे  लाचखाऊ,  क्लायमँक्स ला  सर्व  काही  घडून  गेल्यावर  य़ेणारे   नाहीतर  एवढे प्रामाणिक  की  आपल्याला  प्रश्न  पडावा , एवढे प्रामाणिक पोलिस कधी असतात काय?
                                      माझ्या   सिनेमात  पोलिसांकडे  एक  तुमच्या –आमच्यासारखा “माणूस” ह्या  नजरेतून  पाहिलं  आहे. त्यांनाही  आपल्यासारख्याच  समस्या  असतात,  त्यांनाही त्यांच्या  कुटूंबासोबत  चार  आनंदाचे  क्षण  घालवावेसे  वाटतात.  त्यांच्यातल्या “ माणसा”चं दर्शन  ह्या  सिनेमात  नक्की  बघायला  मिळेल.

Tuesday, November 16, 2010

निंदा कोणी, कोणी वंदा..येई धावून वेळेला रे खाकीवाला बंदा….

मुंबईवरील  २६/११ अतिरेकी  हल्ल्याच्या वेळी  महाराष्ट्र  पोलिसांनी ज्या धैर्याने  दहशतवादाचा सामना केला,  तो त्यांच्या कर्तव्याचा भाग  नक्कीच होता. पण त्यांनी दाखवलेलं साहस  म्हणजे,  आपल्या  सर्वांवर  केलेले  उपकार  होते,  हे   कायम लक्षात ठेवलं पाहिजे.  कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणा-या पोलिसांनी   अतिरेक्यांना कसं  सामोरं जावं, याचं  रीतसर ट्रेनिंग दिलं  जात  नाही.    घरचं  बजेट  सांभाळणा-या   माणसांना  अचानक   भारताचा  वित्त  मंत्री  केलं , तर  काय  डोंबल  समजणार???
                              नेमकं हेच २६/११ च्या वेळी घडलं होतं.  देशाच्या विरोधात  पुकारलेलं   ते  अघोषित युद्धच   होतं ना !  अतिरेक्यांच्या   हातातल्या एके ५६ , एके ४७ या हत्यारांना   पोलीस ३.३ रायफलने  प्रत्त्युत्तर   देत  होते.  त्याने  काय साध्य होणार?  तरीही त्यांनी  प्रयत्न  सोडले नाहीत. खरंच  हे  पोलिसांचे उपकार  म्हणायला  हवेत.  जगभरात  एक  अद्वितीय  घटना घडली, जीवंत  अतिरेक्याला  पकडलं  गेलं.
जगाच्या  पाठीवर असा  तुकाराम  कुठेही   पाहायला  मिळाला  नाही. तो   तुकाराम या  महाराष्ट्राच्या  मातीतलाच.. महाराष्ट्र  पोलिस दलाचा जवान होता.
                                       “ घरा-दारा  सोडूनिया तुझ्या-माझ्या साठी
                                        निघाला पोलीसमामा उपाशीपोटी
                                       लढाया बंदुकीशी घेवूनि हाती काठी
                                         उन्हातान्हामधी, बाबा खाकीवाला उभा देवाच्या रूपामधी
                                         निंदा कोणी, कोणी वंदा..येई धावून  वेळेला रे खाकीवाला बंदा….”

Saturday, November 13, 2010

create quality cinema

Odyssey Corporation Limited is one of most emerging film production & distribution house based in Mumbai. Its sole aim to create quality cinema in the coming future & penetrate the market with several diverse film projects while creating niche within without compromising on the entertainment factor.
The company has a vision to bring original talents into the Indian Film Fraternity & get the best out of them. Odyssey Corporation Limited is a public listed company at Bombay Stock Exchange. We are engaged in Construction business & Financial Services.
After the success of Khatta Meetha’s Worldwide release, Odyssey Corporation Limited is now producing a Marathi Film ‘ON DUTY 24 TAAS’. The film has been directed by renowned filmmaker Kedar Shinde & will be releasing soon all over Maharashtra.

Exclusive photos of making of "On Duty 24 Taas"










“ ऑन ड्युटी २४ तास”.

२६/११ च्या हल्ल्यानंतर चौकशा – राजीनामे- शोकसभा खूप काही झालं! यात वाद-संवाद ,आरोप-प्रत्यारोप खूप काही घडलं! पण आपण आपल्या शहीद वीरांना गमावल्याची सल तशीच राहिली. मीही माझ्या कामात गुंतलो.  २६/११ तारीख आल्यावर ती घटना त्या दिवसापुरती चर्चेत राहिली.
                                  वर्षागणिक एक मराठी सिनेमा निर्माण करायचा, असा काही दिवसांपूर्वी मी संकल्प केला होता. २००९ साली “इरादा पक्का” नावाचा सिनेमा दिग्दर्शित केला होता. २०१० साली काय करायचं, असा विचार डोक्यात येत असताना “ओडिसी कार्पोरेशन लिमिटेड” कंपनीचे प्रमुख मला भेटले. त्यांनी माझ्यासोबत सिनेमा करण्याची इच्छा व्यक्त केली, पण संहितेचं काय? सिनेमा करायचा, तर तो टिपिकल विनोदी.  काहीतरी आगळं-वेगळं करायला हवं,हे डोक्यात पक्कं होतं. अचानक संतोष पवार आठवला. खूप वर्षांपूर्वी आम्ही एकत्र स्पर्धा करत असताना, त्याची “अटेन्शन” नावाची एकांकिका गाजली असल्याचं  स्मरण झालं. ताबडतोब फ़ोनाफ़ोनी करून भेट झाली. त्याच्या कथेवर सिनेमा करायचा विचार डोक्यात रेंगाळू लागला. त्यालाही कल्पना आवडली आणि त्या कथेवर पटकथेचे संस्कार सुरू झाले.
आता लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार केदार शिंदेचा नवा सिनेमा असेल, “ ऑन ड्युटी २४ तास”.
                                                       
                                                                               केदार शिंदे