मुंबईवरील २६/११ अतिरेकी हल्ल्याच्या वेळी महाराष्ट्र पोलिसांनी ज्या धैर्याने दहशतवादाचा सामना केला, तो त्यांच्या कर्तव्याचा भाग नक्कीच होता. पण त्यांनी दाखवलेलं साहस म्हणजे, आपल्या सर्वांवर केलेले उपकार होते, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणा-या पोलिसांनी अतिरेक्यांना कसं सामोरं जावं, याचं रीतसर ट्रेनिंग दिलं जात नाही. घरचं बजेट सांभाळणा-या माणसांना अचानक भारताचा वित्त मंत्री केलं , तर काय डोंबल समजणार???
नेमकं हेच २६/११ च्या वेळी घडलं होतं. देशाच्या विरोधात पुकारलेलं ते अघोषित युद्धच होतं ना ! अतिरेक्यांच्या हातातल्या एके ५६ , एके ४७ या हत्यारांना पोलीस ३.३ रायफलने प्रत्त्युत्तर देत होते. त्याने काय साध्य होणार? तरीही त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. खरंच हे पोलिसांचे उपकार म्हणायला हवेत. जगभरात एक अद्वितीय घटना घडली, जीवंत अतिरेक्याला पकडलं गेलं.
जगाच्या पाठीवर असा तुकाराम कुठेही पाहायला मिळाला नाही. तो तुकाराम या महाराष्ट्राच्या मातीतलाच.. महाराष्ट्र पोलिस दलाचा जवान होता.
“ घरा-दारा सोडूनिया तुझ्या-माझ्या साठी
निघाला पोलीसमामा उपाशीपोटी
लढाया बंदुकीशी घेवूनि हाती काठी
उन्हातान्हामधी, बाबा खाकीवाला उभा देवाच्या रूपामधी
निंदा कोणी, कोणी वंदा..येई धावून वेळेला रे खाकीवाला बंदा….”
Khare Aahe....
ReplyDeleteधनयवाद केदार शिंदे साहेब मी on duty 24 taas चे प्रीव्हिऊ बघितले आमच्या पोलीस खात्यावर सिनेमा काढल्या बद्दल कारण त्यामुळे पोलिसाचा खरा चेहरा लोकांना बघायला मिळेल रोजची duty करते वेळी काय प्रसंगांना तोंड ते आम्हालाच माहित आहे मी हा सिनेमा जरूर बघेन आणि सिनेमा गृहातच व माझ्या सर्व मित्रान पण बघायला सांगेन कारण मी पण on duty 24 taas असतो काही तरी उत्तर द्या मी वाट बघेन mangesh.kardak@gmail.com माझा e mail i d आहे
ReplyDelete