Saturday, November 13, 2010

“ ऑन ड्युटी २४ तास”.

२६/११ च्या हल्ल्यानंतर चौकशा – राजीनामे- शोकसभा खूप काही झालं! यात वाद-संवाद ,आरोप-प्रत्यारोप खूप काही घडलं! पण आपण आपल्या शहीद वीरांना गमावल्याची सल तशीच राहिली. मीही माझ्या कामात गुंतलो.  २६/११ तारीख आल्यावर ती घटना त्या दिवसापुरती चर्चेत राहिली.
                                  वर्षागणिक एक मराठी सिनेमा निर्माण करायचा, असा काही दिवसांपूर्वी मी संकल्प केला होता. २००९ साली “इरादा पक्का” नावाचा सिनेमा दिग्दर्शित केला होता. २०१० साली काय करायचं, असा विचार डोक्यात येत असताना “ओडिसी कार्पोरेशन लिमिटेड” कंपनीचे प्रमुख मला भेटले. त्यांनी माझ्यासोबत सिनेमा करण्याची इच्छा व्यक्त केली, पण संहितेचं काय? सिनेमा करायचा, तर तो टिपिकल विनोदी.  काहीतरी आगळं-वेगळं करायला हवं,हे डोक्यात पक्कं होतं. अचानक संतोष पवार आठवला. खूप वर्षांपूर्वी आम्ही एकत्र स्पर्धा करत असताना, त्याची “अटेन्शन” नावाची एकांकिका गाजली असल्याचं  स्मरण झालं. ताबडतोब फ़ोनाफ़ोनी करून भेट झाली. त्याच्या कथेवर सिनेमा करायचा विचार डोक्यात रेंगाळू लागला. त्यालाही कल्पना आवडली आणि त्या कथेवर पटकथेचे संस्कार सुरू झाले.
आता लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार केदार शिंदेचा नवा सिनेमा असेल, “ ऑन ड्युटी २४ तास”.
                                                       
                                                                               केदार शिंदे

No comments:

Post a Comment